Ramraje Naik Nimbalkar | मतदारसंघात मी काय केलं हे विचारायला तुमचा जन्म तरी झाला होता का?
"मी या भागासाठी काय केलं हे विचारायला विद्यमान आमदारांचा जन्म तरी झाला होता का? चिलट डास चावतच असतात... आमदारावर बोलून मला कमीपणा करून घ्यायचा नाही": माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर सातारा: फलटण विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती या टिकेचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेतलाय.विद्यमान आमदार माझ्यावर टीका करतात.मी या भागासाठी काय केलं. हे विचारायला त्यांचा जन्म तरी झाला होता का? मी काय केलं हे तुमच्या वडिलांना चांगलं माहित आहे. ते आमच्या घराशी संबंधित होते.... चिलट, डास येतच असतात.. ढेकूण तर चावतच असतो विद्यमान आमदारांकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे मला स्वतःच्या विषयी कमीपणा करून घ्यायचं नाही. कृष्णा महामंडळ त्याला काय त्याच्या नेत्याला देखील माहित नाही.... तो एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो जे शिकवतो ते इथं येऊन तो बोलतो.... त्यांना जर या भागाचे कल्याण करायचे असेल तर म्हसवडची एमआयडीसी या भागात आणून दाखवावी आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू. असे प्रत्युत्तर रामराजे यांनी वाघोली येथील सभेत दिल आहे.